Powered By Blogger

Saturday, 8 July 2023

"ती आणि तो प्रकरण - ५" Betterment is the best policy but not EVERY TIME...!


          बदल हा असावा पण तो एकोएकी नि आमूलाग्र नसावा,खरं तर सवय नसते ती त्या प्रमानाबाह्य उत्कट भावना सहन करण्याची...... शेवटी झालं तेच....जे नकोस होतं परंतु आलिया भोगासी असावे सादर या म्हणीला सार्थ करण्यात आपलं सर्वस्व अर्पण करीत प्रियकर मात्र बेधुंद होऊन प्रियसीच्या आधीन होता.

      दुष्काळ हा कोरडा नसून केव्हां अतिवृष्टी मूळे ही दुष्काळ ओढवला जातो, आता त्यांचा दुष्काळ कोणत्या प्रकारात मोडल्या जातो त्या बद्दल आपण विश्लेषण करणं म्हणजे त्या प्रियकराच्या ताज्या-तारुण्यात नाहलेल्या जखमांना मिठ चोळण्या सारखेचं आहें बघा.ज्या प्रमाणे उंदराला जशी ती चिंधी सापडते आणि त्याचं चिंधीचा त्या उंदराने केलेला सर्वत्र भोभाटा तिचं हुबेहूब परिस्थिती आज प्रियकराने स्वतःवर ओढवून घेतलेली होती.आपल्या जीवापाड त्यानें प्रयसीला जपलं,जीव ओतला,तिचं प्रत्येक सुख-दुःख हे स्वतःच चं समजत प्रियकर बिनधास्त त्या सुंदर दिसणाऱ्या परंतु खडतर आणि काटेरी रस्त्याने मार्गस्थ होता.

          तसं इतिहासात डोकावलं तर फार काळ हीं नव्हता तसा यांना एकमेकांना समजून घेण्यात परंतु या अल्प अवधीत नको नको तेंच घडून आलं होतं.कुठं तरी नको ती संशयाची ठिणगी हळूच येऊन ठेपली होती फक्त तिला ज्वलनास प्रतिकूल परिस्थिती अजून तरी पूरक नव्हती चं. कुणी सांगावं आणि त्या वरती प्रियकराने सहज चं विश्वास करावं हे तर अशक्य चं हा...! कारण प्रियसीच्या प्रेमाच्या सावलीत प्रियकर मात्र चांगलाच न्हाहून निघाला होता.तिने अध्यादेश काढावेत आणि प्रियकराने ते क्षणाचाही विलंब न होता पूर्णत्वास न्यावे हाच त्यांचा नित्यक्रम बाकी मात्र ठरलेला होता.सुरुवात तर फार सुरेख आणि सुंदर चं झाली हो मात्र ती वेळ कदाजीत पुरेशी नसावी कारण.....
"नात पूर्णत्वास कसे जाणार यांची तिळमात्र शास्वती ही त्या नात्याच्या सुरुवातीवर चं अवलंबून असतें"
मग ते नातं कुठलंही असो...!

            नाती ही फार बारकाईने जपावी नाही तर एकदा गेलेली तळा ही एका क्षणार्धात चं सारं होत्याचं नव्हतं करण्यात विलंब लागतं नाही.
"ज्या प्रमाणे आई आपल्या जवजात बाळाला जपते ना हुबेहूब तशीच नाती जपावी नाही तर उगाच चं कशाला औपचारिकतेचे धडे गिरवावे."

          ज्या प्रमाणे पर्भब्रह्म पांडुरंगाचे भक्त त्यांच्या भगवंताची आषाढी एकादशीला दर्शनासाठी तिव्र भावनेनं वत बघतात नां तिचं भावना जागवत प्रियकर ही प्रियसीच्या भेटी ची आणि दोन प्रेमाचे शब्द हितगुज करण्याची वत बघत असें. तसें रोज भेटीगाठी होतील असं काही नाही कारण ती दोघे एका महाविद्यालयात जरी शिक्षणास असले तरी त्यांचे विभाग मात्र निराळेचं होतें. केव्हा ही वेळे आधी वर्गामध्ये न हजेरी लावणारा हा प्रेमवेडा मात्र तिच्या त्या लाजऱ्या स्मितहास्या साठी मात्र वेळेलाही मागे सारत पुढे धाव घेऊ लागला.

       परंतु सगळं काही सुरळीत फार काळ कसचं हो टिकणार तेंच आता इथं होणार होतं,
            
                         ना होकार द्यायचा... ना नकार....!


         मात्र सेवा-कार्य पूर्णच करून घ्यावे ही स्वार्थी भावना कुठंतरी प्रियसीच्या मनात खंबीर होती.पूर्ण पडताळणी होण्याआधी चं मी कशी चं याला होकार घालू आणि याच्या पेक्षा ही परिपूर्ण मिळाला तर याचं संकुचित आशेवर ती जगत तर इकडं प्रियकर देवदास होण्याच्या मार्गावर चं होते.खरं एका सुसंकृत मुलीने हा विचार का न बरं करावं ? मात्र यात त्या निर्दोष प्रियकराच्या भ्रमनिरास चं काय ? जसं वयानुसार आपलें वडिल सगळं काही आपल्या पदरी बहाल करतात ना तसंच या प्रियकराने प्रियसिस सर्वस्व अर्पण केलं होतं.

       Betterment हे असावं खरं मात्र ते भावनांशी खेळणार नसावं, फार विचित्र अशीं परिस्थिती ओढवणार ते सारं होतं. आज वर आम्हीं ही Betterment ला बळी गेलोय खरें परंतु अश्या भावना बहाल करून नव्हेचं आणि असाच काहीसा निर्दयी प्रकार त्या प्रियसी कडून घडत होता.

       या प्रकाराला बळकट करणाऱ्या तिरस्कारी घटना ही कारणीभूत होत्या चं, त्या प्रियसीचं याला वेळवेकी टाळणं हेही आता वाढलं च होतं.एक आठवण म्हणून यांनी तिला कॉल करावा आणि तिचा बिनधास्त कॉल व्यस्त यावा,इत्यादी बाबींचा हा घेरावा काही सहज नसावा. आणि आता याचं सर्व घटना एकाएकी येऊन ठेपल्या तर त्यास अजून ही सबळ करणारी ती बिन-बुळाची रिकामी लोक त्या प्रियकराला धास्ताहुन सोडत.

   नेमकं कुणाचं खरं नि कुणाचं खोटं हे मात्र गुलदस्त्यात च बरं हा......एक लेखक म्हणून मला ही या प्रकरणात रजा बहाल करा आणि ईश्वराला नकमस्तक होऊन त्या भ्रमास बळी पडलेल्या प्रियकरासाठी प्रार्थना करा. 

"Betterment is the best policy but not EVERY TIME"

धन्यवाद....☺

Sunday, 24 November 2019

स्तुती-सुमन....!



          मी नेमकं काय म्हणावं.... नेतृत्व म्हणावं.... की सौंदर्य म्हणावं....की कला गुणांनी सदाबहार बहिलेलं रसाळ फळ म्हणावं....की एक कुशल व्यवस्थापक म्हणावं... की एक उत्तम समनव्यक म्हणावं... मी काहिहि जरी म्हणावं तरी मात्र तिनें ते स्वीकारावं...!

मी माझ्या आयुष्यात अनेकांना अत्यंत निरखून जाणलं त्या पैकीं एक या व्यक्ती बद्दल मला आज सांगावंसं वाटतं.

एक सुंदर देखणी मुलगी म्हणून फक्त यांच्या बद्दल माझ्या मनात एक चित्र रेखाटल्या गेले कारण ती व्यति रेखाटताना ईश्वराला सुद्धा अनेक कसोट्यानं मधन जावं लागलं असेल...!दिसायला अति सुंदर, उंच -मध्य असा महाराष्ट्रीयन मुलीला साजेल असा बांधा,महाविद्यालया चा गणवेश कितीही चेष्टा जनक असला तरी ती मात्र काही आपलं रूप घालव्याची नाही,नैसर्गिक प्राप्तीने साध्य असणारा मखमली चेहरा आणि बरचं काही असं काहीसं. सतत येता जाता त्याचं रोज नित्यनेमाने दर्शन व्हायचं चं हा. माझा प्रवेश हा सरळ द्वितीय वर्षीय असल्याने मला मात्र जास्त अस काही महाविद्यालया बद्दल माहिती नव्हतं चं.

असो,महाविद्यालयात म्हटलं ना की हे काय नवीन नाही यात काही वावगं नसलं तरी ही व्यक्ती मला वेगळीच वाटली.आता  ती कशी तर सांगतो....

या व्यक्तीचा आणि माझा शेवट पर्यंत तिळमात्र ही संबध आला नसावा जे काही कार्य माझ्या वाटेला आली ती मी केवळ आदेश म्हणूनच स्वीकारली कारण त्या माझ्या पेक्षा वयोवृद्ध होत्या.मी त्यांना सांस्कृतिक कार्यक्रमा मध्यें सूत्रसंचालन करतांना बघितलं, एरव्ही कोण ऐकत ते पण त्या मंचावर येण्यातच आणि माझ्या लक्ष त्यांच्यावर. अहो मराठ-मोळ्या स्त्री च दर्शन देणारी व्यक्ती सुंदर आणि देखण्या सारी मध्यें शिस्पियर सारखं फाळ फाळ बोलू लागली.म्हणजे ती जे बोलली ना ते माझ्या पदरी ही पळत नव्हतं.अर्थातच आज मला त्यांच्या सौंदर्या बरोबरच मौखिक बोलीने सुद्धा भारावून सोडलं.मी त्यांना बाघण्यासाठी मंचाच्या मागील बाजूस गेलो असता त्यानीं अक्षरशः दुर्गेचे रूप धारण केलं होतं,सर्वत्र सावळा गोंधळ चालूं असतांना त्या मात्र धिटपणाने तो मोर्चा सांभाळत होत्या.


आता असं भारदस्त नेतृत्व मागे कसा असणार, अंतिम वर्ष्यात असतांना त्या गर्ल्स रेप्रेसेंटटीव्ही झाल्या, त्यांच्या अनेक नेतृत्व असलेल्या समित्यांन मध्ये मला त्यांच्या बरोबर काम करण्याची संधी ही मिळाली.लहान मोठी काम मी एक ज्युनिअर म्हणून त्याच्या कड दखल देत असो, त्याही त्वरित चं ते उरकवून घ्यायच्या.

त्यांच्या याचं नेतृत्व बजांवणीला अनेकांनी शह ही देण्याचं धाडस केलं परंतू ते कांही फलश्रुती स आलं नाही. काम न करता काम करून घेण्याची त्यांची छबी मी आ-जन्मी विसरणार नाही.अनेकांना उत्तर देत त्यांनी मात्र सगळं कांही प्राप्तीस नेऊन ठेपविलं.

तो दिवस मला अजूनही आठवतो, त्या महाविद्यालयात मधन कायमच्या जात होत्या, मी ही आपलं एक सच्चा भक्त म्हणून भेट घेण्यास गेलो असता,माझी काही बोलण्यास हिम्मत जुटली नाही,खर तर मला त्यांना बघवत ही नव्हतं.त्यांचे कामलनयनी सदैव खुलून उमटणारे डोळे आज अश्रूंनी बंब होते,मी आपलं मागें च स्तभं म्हणून उभा होतो.शेवटी जाता जाता त्यांनि च जवळ येत मला असं संबोधलं की

     तसं आपलं काही जास्त बोलणं नाही,पण जो वेळ मिळाला तो छान होता आणि चला येतें मी...!
असं मी पण त्यांच्या समवेत रडू कोसळलो आणि त्या मार्गस्थ झाल्या.त्यांनी सहज च माझ्या लिहिण्याची स्तुती केली आणि मी भावनेच्या भरात...
मी तुमच्या वरती ही काही लेख लिहू इच्छितो असो त्यांना विचारलं आज तिचं पूर्तता मि करतोय...!

त्या नंतर त्या ज्या ज्या वेळी शेगाव ला आल्या त्या त्या वेळी आल्या बरोबर श्रीं च्या दर्शनासाठी गेल्या,या तुन पुन्हा एकदा मला या व्यक्ती च आध्यत्मिक रूप दिसून आलं.

आर्थतच जवळीकता वाढल्या नंतर माझ्या शब्दांना मान देऊन पुन्हा महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमास दाखल झाल्यात.
त्या बद्दल त्याचें मनस्वी आभार...!

आज मला एका व्यक्तीत आध्यात्म, प्रेम,आवड,सौंदर्य, संगोपन, राजकारण, आदर आणि जिव्हाळा निदार्शनास आलाय.

आज पुरुषप्रधान या भारतीय मातृभूमीवर यांचं असणं हे नक्कीचं एक नव्या पर्वाची सुरुवात करणार वाटतं....!

शेवटीं हेंच... त्यांनी माझ्या या तिळमात्र प्रयत्नाला स्वीकारून, असंच मार्गदर्शक म्हणून राहावं...!

या राजस्वी व्यक्तिमत्वास मनस्वी हार्दिक शुभेच्छा...!

Views are absolutely personal.

Thursday, 31 January 2019

अनेकांच्या अनेक अश्या नात्यांना साक्ष ठरणारी हिचं ती वाटिका....!


       आता दिल्लीचं वारं आमच्या पर्यंत ही फोफावल होत,विद्यमान पंतप्रधानांनी घेतलेला तो नोटबंदी आणि त्याला सबळ देणारा तो कॅशलेस चा निर्णय आमच्या पदरी पडणं यात काही वावगं नाही बरें.त्यांनी आदेशी काढलेले निर्णय हे योग्यचं,परंतु या सर्व प्रकरणात आम्ही मात्र होरपळून निघालो.तर याचं निर्णयाचं स्वागत करीत आम्ही ही ATM च्या रांगेत निघालो खरें,परंतू काही दिवसांपूर्वी चं महाविद्यालयातील ATM मधील रक्कम तळाला गेलेली होती,ना इलाजस्तव नगरामध्ये (गावामध्ये) धाव घेण्यापलीकडे दुसरा पर्यायी मार्ग ही नव्हताच.

      माझ्या काही अति जवळील हितचिंतकान सह आम्ही नगरी मध्ये आपल्याचं पैशाचं समीकरण बांधण्यास निघाेलो खरे.आता रस्ताने अति शिस्तीत आणि शांततेत मार्गक्रमण करणाऱ्यांमध्ये आम्ही मोडत नव्हतोचं.तर पहाटेच्या सूर्योदया पासनं तर सूर्यास्ता ला येऊंन ठेपतील त्या सर्व अश्या उत्कट बाबी आम्ही चर्चेस उतरलो खरें, तरी माझं च खरं हा.....!असं रेट-रेटून सिद्ध करण्यास जो पहावा तो मात्र मंत्रमुग्ध होता.चर्चेला उधाण येऊन ठेवलं होतं तर दुसरी कडं जिथं जायचं होतं ते स्थळ मात्र छातीवर चं होत.

        तशी पैश्यांची चणचण सर्वांनाच हो....!परंतु आधी मात्र कोण त्या ATM वरती झडप घालतो यातं च सर्वांची कसरत होऊ लागली नक्की.तसं एक वेळीं एकाचं ग्रहकां न ATM च्या खोलीत शिराव हा नियम तर आम्ही समूहाने आत शिरत चं मोडीत काढला होता. आपल्याला लागतील अशी सुटसुटीत रोकड आम्ही आगलत केली खरी. आता अगदी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू ररामचंद्रांन सारखे मर्यादित ही आम्ही नसावेत; याला परिपक्व ताळमेळ बसावा म्हणून आता आलो चं तर सक्तीन दिलेल्या त्या निर्दोष पोटाचं तिळमात्र तरी सांतवन करावं तर लागूनच असलेल्या चौपाटी ला आम्ही  सरेआम दत्तक दिली.सगळें आता आप-आपल्या चिभेच्या चोचल्यानां त्या खानावळीतील (मेस) निरागस चवीला राराम ठोकत आज दिलखुलास होणार होतें.

          आतां सर्वचं बाहेर अल्पउफार करतील मग आपणचं का ? मागे सरायचं;याचं भावनेला साद देत मी मार्गस्थ झालो खरा...!आपल्याला हवं-हवं ते सारं जो तो मागवत होता आणि मी पण तसंच करून मोकळं झालो.ऑर्डर केल्यानंतर १५ मिनिटांनी चं आपला मेनू मिळेल अशी सक्त ताकीत त्या मेनू बोर्ड च्या तळाला टिप्पणी लिहिलेली होती, आता हा मात्र आम्हाला आलेला गहन प्रश्न च ना.....!नेमकं करावं तरी काय इतक्या वेळ? तर सहज पणे माझं लक्ष वेधून घेईल असा प्रेमाचा झरा उतू जात असलेलं नित्रदीप चित्र निदर्शनास आलं. काय जिव्हाळा हो त्या घास भरवण्यात......! मी तर दंगच होऊन नाहलो. एक प्रियकर त्याची समजल्या जाणाऱ्या (अर्थात अनेकां न पैंकी तो तिचा एक.....आता असें किती याचा विचार न केलेलाच बरा)
प्रियसीला पाणीपुरी चे फुग्गे अलगत चं भरवत होता. काय नजारा ना.....एक पाणीपुरी त्या फुग्गे वाल्यानी प्रियकराला द्यावी नि नंतर त्याने ती अलगत हस्तगत करत तिची शहानिशा करावी नि त्या प्रियसीला द्यावी.........व्हा.....!

         काय प्रेम ना,नाही म्हणजे आमच्या पदरी फक्त दूरदर्शन आलं असावं या बाबतीत कारण असं काही अद्यायत आमच्या सोबत घडलं च नव्हतं तर आम्हांला ते दृश्य च कौतुकास्पद चं हो....!त्या ऐतिहासिक क्षणाचे आम्हीं मात्र साक्षीदार होतो, हेंच आमचं आहोभाग्य समजून आम्ही सारे एकांकि विचारत गेलो नि एक-मेकांसी सांगू लागलो की धिर धर भावा....... होईल,जर भाग्यात असेल तर हाही सोनियाचा दिन नक्कीचं उजाडेल. अश्या तिव्र विचारमंथनात आम्हीं दिलेली ऑर्डर केव्हां फळाला आली हेही आम्हांस कळलं नाही.आता आपल्याला कुणी प्रियसी त्याचं प्रेमानं काही ती मेजवानी भरवेल असं बलाढ्य मनमोकळ्या मनाने आम्ही स्वतःच स्वताला भरवण्यास श्रीगणेशा केलां.

            आज जे काही दृष्य आम्हीं उगढ्या डोळ्यांनी बघितलं,यांची चं काही शी जखम माझ्या एका मित्राला खोलवर टोचल्या गेली होती,त्याचं मन काही धिर घेईना. याचं दृष्याचा सबळ संदर्भ पुरावा घेत साहेबांनि,तो पूर्ण वाटिका परिसर पिंजून काढला, जे आधी बघितलं ते त्यांस वारंवार निदर्शनास येऊ लागलं मात्र या वेळेस काही शी परिस्थिती विचित्र होती.तसं साधारणतः आमच्या महाविद्यालयातिल विद्यार्थीआणि विध्यार्थीनी आळी-पाळीने येत असतात आता ते कोण कुणा सोबत येतं य हे मात्र गोपीनिय बाबा या बद्दल तो माझ्या कडं काही पुटपुटला नाही.तरी त्याची मानसिक स्थिती अजून ही काही स्थिर नव्हतीच.मी हळूच एका घनिष्ट सहकारी या नात्याने त्याला विचारलं......
  काय रे काय झालं हा तुला......?
 
  कसला विचार करतोय....!
           त्या वर तो मात्र खूप सावधगिरीने बोलला की काही नाही रे....! मि खूप दा मुलां-मुलींना या वाटिका कडं तर काही प्रियसी-प्रियकरांना प्रेमाचा वर्षांव करताना बघतो.
    त्या वर मी बोललो.....हो त्यात तू का एवढा अस्थिर झालासं ?
    ती म्हणाला नाहीं नाहीं..... मला काही अडचण नाहीं परंतु एक निदर्शनास आलंय हा.....!
       मी म्हणालो काय तर......आपल्याला मिळालेल्या स्वा तनत्र्याचा मात्र सौराचार होतोय....

      मी म्हटलं कसा..... नाही म्हणजे ते जे करताय हे त्यांच्या परीने योग्यचं. परंतु मी मागील बऱ्याच महिन्यांपूर्वी न बघतोय की याचं वाटीके ला येऊन ठेवणारी अनेक जोडपी मी खुद्द प्रेमाचा वर्षाव करताना बघितली.ते सारे जोडप्याने निच यायचे खरें मात्र जोडीदार हा मात्र नेहमीचं बदलत दिसला मला.....!मी म्हटलं अरे उगाच चं काय बोलतोय....?असं काही नाही हा....ती म्हणाला अरे खरंच हे सारं खरंय.
तुला मी बोललेले खोटं च वाटेल म्हणून चल माझ्या मागं मी दाखवितो तुला असं म्हणत त्यांनी मला पूर्ण चौपाटी पायी पिटवली परंतु त्याचा तो तिळमात्र संशय मात्र माझ्या ही ठाईमनी रुजून बसला.

        खरंच ना किती आमूलाग्र हा बदल जसे ऋतू बदलतात तसें इथं आम्ही जोडीदार बादलताना बघितले.... अगणित शोकांकिता हा.....!कुठं नीतिमत्ता उतलीच नाहीं कीं काय आणि आपण खरंच कलियुगात वास्तव्य करतोय याची मात्र आम्हांला तेंव्हाच पोच पावती मिळाली. आपल्या सर्व तत्वांचा आणि संस्काराचा गळा घोटत ती सर्वत्र हरकत करीत होती.आता या वर के बोलावे म्हणून मी माझ्यातील संयम-रावांना नव्याने बळकट करीत त्या वाटीके वरिल दुकानदारांचा आणि विक्रेत्यांचा थोडा विचार केला, जे कुणी होते त्यांचा नि माझा अर्थाअर्थही संबंध नाही परंतु २ पैसे मागे पडण्याच्या प्रामाणिक हेतूने आज ते सर्व घर-दार सोडून आपल्या जन्मभूमी च पलायन करीत इथं सेवेत रुजू होते.आम्ही तर कामानिमित्ताने त्यांचे बांधील होतो मात्र त्या अनेक अश्या प्रियसी-प्रियकराच्या जोड्या त्यांचे आर्थिक समीकरण बळकट करीत आज त्यांच्या बऱ्याच गरजा पूर्ण करीत होते.

        जर आज त्याचं प्रेमाने प्रयसी नि प्रियकर सत्यत्याने त्या वाटीके भोवती आपले प्रेम उधळन्यासाठी जात असतील तर मला वयक्तिक तरी खूप आनंद आहे कारण......
    
      प्रेमाने पोट जरी भरत नसलं तरी......
  
       आज त्याचं प्रेमाची चाहूल त्या जोडप्यांना वाटिका गाठायला लावते आणि गाठलेली वाटिका त्या सर्व विक्रेत्यांना अनेक आर्थिक समीकरण बनवत,त्यांना बळकट बनविते बाकी एका निस्वार्थी मनानी मला काही नकोय.....

       मग जाऊ द्या ती नीतिमत्ता नि ते उत्कट संस्कार त्याचं बघू हो समोर असं उपहासात्मक बोलून मी माझ्या मित्राला सडेतोड त्रासातून क्षणभर मुक्त केलं.....!
   आम्ही तरी हे असलं दृष्य आज च बघितलं त्याचा जो त्रास झाला काही सा पुन्हा नव्याने भ्रमनिरास झाला ते जाऊ द्या..... परंतु या सर्व उघड्या प्रकाराला मात्र तिचं एकटी ठामपणे साक्षीदार आहे.....

      
      कोण कुणा सोबत येतंय....
      किती दा येतंय.....
      नेमकी कोणती जोडी खरी...........
   
        अशी अनेक निउत्तरी प्रश्नाची उत्तरे त्या वाटीके कडे मात्र बिनचूक आणि सबळ च असावी......म्हणूनच मला म्हणावंस वाटत यं की,

   अनेकांच्या अनेक अश्या नात्यांना साक्ष ठरणारी हिचं ती वाटिका....!

धन्यवाद....!


टिप: - वाटिका हे चौपाटी प्रमाणे विरंगुळा करता येईल असे रमणीय स्थळ आहे.आणि जो मचकूर नमूद केलाय त्याचा आणि वास्तविकते सोबत कुठलाच सहसंबंध नाही.सारे काही काल्पनिक.....☺

Monday, 12 November 2018

You Can’t Plan Love in Your Life…... It Just Happened!!!”



On the first day of my school after a long vacation, my mother declared I was lazy, because I snoozed my alarm every day,  spent a lot time in shower, took about half an hour to finish my lunch, ate dinner very slowly, rarely listen to mom, and devoted my abundant time to my XBOX.
                Whenever you thought the opening date of school is nearby, you got depressed, you took glimpse of the whole vacation, you went to meet your friend and he told something to you which was very important and you totally forget about it, “Vacation Assignments”. Those assignments, projects were eclipse to everyone’s vacation (I thought those assignments had direct relation to my depression).
                My mom believed that I was lazy as well as dumb, so she helped me in my assignment work (that was very helpful for me) and she checked it three times before the opening date of school.
                St. Xavier's International English School, I read the name before entering in school. On the first day of the school, of course, I felt depressing as hell. I took a long breath and walked towards the classroom. Teacher was not arrived so I directly entered in the classroom. Pratik was my one and only friend in school, he chose the last third bench. I noticed Pratik because as I entered in classroom he called my name loudly and asked me to join him. Last third bench, it’s fine, I had no option than this. New start of 10th grade class on last bench, too good.
                Mr.  Sharma entered in the classroom, the 10th grade teacher and the only strict person in the whole school. The most deadly thing was, school principal made him our class counselor. And here it started, he gave us glimpse of the syllabus, gave us warnings not to talk, not to laugh and not to share anything in lecture.
                Then we introduced ourselves: Name, favorite subject, last year percentage, hobbies. I’m Arjun, history, 56.32%, playing XBOX. When all done with their introduction Mr. Sharma asked if anyone wanted to share the vacation memories related to education or something interesting and educational, then some jerks (we called them toppers) starts their experience sharing movies. The only interesting personality was Neha, long faced, skinny girl, because she talked to Mr. Sharma a lot about her  experience and  wasted teacher’s half of the lecture.
                After few weeks, I tired my level best to improve myself in study, but everyday I got punished in the school. My little brain gave a suggestion to leave the school. I sat on the couch with my mom watching the movie, I had already seen but still:
Me: “I am not going to school  from tomorrow”
Mom: “Why, What happened?”
Me: “I get punished everyday, I tried my level best in study but still. I think I am not     made for study”
Mom: “OK, then what are you going to do after leaving the school?”
Me: “I don’t know that!!!”
Mom: “You can work as milkman or paper-man”
Me: “No mom!!!”
Mom: “You make this choice yourself, now do such thing to earn money, we are not     going to give you money”
Me: “No mom Pleaseee……”
Mom: “Then go to your bed, it’s too late and tomorrow is your school, you want to        get up early”
That conversation shut me up, I agreed too.
                On the next day my mom dropped me to the school, “Do you want me to come and meet to your teacher, not to punish you again?”
“No, mom it’s all OK”, I said adjusting my bag.
“Enjoy the day”, she said and rolled up the window as I went in.
A girl was staring at me.
I was quite sure that I’d never seen her before. Long open hairs, beautiful eyes with some eye liner in it, a simple nose ring made her beautiful face more fascinating,  her earing was like little stars, perfectly shaped nails with red nail polish on it and she had cute smile with perfectly curved body.
I looked away, I felt nervous. I was wearing the same shirt on which a big stain of ink was present. I didn’t like that shirt and my hairs also, to much oil in it (behind this hairstyle, all credits goes to my mom). I knew how dumb I was looking at that point. I cut eye contact to her, but her eyes still on me.
                I looked at the blackboard, in the textbook. I repeated that cycle two three times and put a glance on her, she was still looking at me. I got little jolt thinking, why she was looking at me. I knew myself very well that I was not that handsome and charming to attract any girl.
                OK…. she was gorgeous, had cutest smile, and fascinating eyes in whole class…. the best part was she was looking at me….. That’s good.
Mr. Sharma started new chapter, I opened my textbook, looked in it, but all my attention was at her. I wrote the whole happened thing on the piece of the paper and passed it to Pratik. He took that piece of paper, read it, and gave me a shocked look asking the girl’s name. I already knew that girl’s bench number where she was seating, I showed her to Pratik by my eye moments.
                Teacher stopped teaching as the bell rang and told us about the new admission in the class. He asked the new admission to give their short introduction to the whole class.
                The same girl who was staring at me stood up at her place and said, “Hello everyone, I am Aishwarya”
That name tickled in my heart. Why, I never knew. I felt happy that day. Why, I never knew. I put that name in my mind and decided to look for her over the Social Media that day itself. I was completely unaware of the beautiful moments which were going to happen in my life after that one search.

Saturday, 20 October 2018

'ती आणि तो' प्रकरण -४ "तुझं माझं जमेना, नि तुझ्या-विना करमेना"



      कुठलंही अवलोकन करतांना रागा-संतापाच्या भरात एकमुखी प्रकरण निकाली काढलं ना की मग हे असं होतं....!क्षणिक द्वेषा पोटीं आपण नको नको ते बोलून बसतो,सर्वस्त्र भावनांची पायमल्ली करतो आणि स्वतःच त्या व्यक्तीस विसारण्या ऐवजी, त्याच्याच सुंदर स्मृतीत जगतो. नेमकं जे आपण जे वरती वाचलं ना अशीच साधर्ममय ठरेल अशी परिस्थिती त्या प्रियसिने प्रियकरास ब्लॉक करून निर्माण केली होती.


     आणि हे बघ मी आता घरी जातेय,तर मूर्खा सारखे कॉल्स,मेसेजेस करून माझी पंचाईत करू नको.....😡 अश्या तिरकीत सशब्दांची प्रियसिने त्या प्रियकरास ताकीत दिली होती आणि याच परिस्थिती ला अनुसरून एके काळी आकाश गंगेतील सूर्य, चंद्र नि तारे ताडून आणू का ग प्रिये तुझ्यासाठी ,असे बडे बडे सूर गावसणारा बलाढ्य-निडर प्रियकर मात्र सुन्न चं होता.
मौतील जसे दारावर जाऊन शोकसभा भरवीत त्या दुःखद घटनेचं काय संतावन केल्या जाईल त्याही पलीकडं सभा भरवीत त्या प्रियकराचं मनाचं संतावन करण्यात जवळ जवळ ची सर्वच मंडळी रुजू झाली होती. 


      तरी प्रेमवेडा प्रियकर काही आवरेना.....................! याचं आपलं तेंच चाललं होतं भावा के कमी आहे माझ्यात....?असे वायफळ प्रश्न बोलत हा प्रियकर त्या प्रियसीच्या प्रेमात तब्बल ६० तास अर्थातच २ पूर्ण नि एक अर्धा दिवस मग्नधुंद होता.आता भल्या मोठ्या तोऱ्यात जरी प्रियसिने त्याला ब्लॉक करुन या साऱ्या प्रकारातून काढता पाय घेतला असला तरी तिला सुद्धा काही करमेना.....कारण
                     घरी जेवतांना तोंच....
                    इतरांशी बोलतांना तोंच....
                    झोपतांना तोंच....
                    ध्यानी मनी सुद्धा तोंच तो.....अशी बोचरी अवस्था त्या प्रियसीची होती. मी त्याला ब्लॉक करून,चुकीचं तर केलं नाही ना केलं? याचं प्रश्नाचं permutations and combination आपल्या डोक्यात घुमवत होती.सुट्यांचा आनंद उपभोगण्यासाठी घरी आपल्या प्रियसीचं धड घरात ही मॅन लागेना. तरी घरातील मंडळींना ही बाब लक्ष्यात आली असता;आपलं फुलपाखरू 🦋 का बरं बैचैन आहे,याची विचारणा करण्यासाठी सामोर आलेल्या आपल्या स्वतःच्या आईला सुद्धा;आपल्या दुधी दातांनी डंख मारत गप्पचं केलं.आपण उगाचंच घरीं थांबून आपल्या स्वकीयांवरच राग ओतन्या पेक्षा प्रियसिने महाविद्यालयात परतण्याचा मनि निर्धार केला असता घरच्यांनी भावनिक ओझे टाकत तिला बंदिस्त केलं.

   शेवटी प्रियसीला जाणीव झालीचं, एक मी स्वतः त्याला ब्लॉक करून जरी या प्रकरणाचा "इतिश्री" करू इच्छित होती,तरी माझ्या स्वतःच्या नीच तर त्याला विसरणं अवघड झालंय, तर त्याचं का होत असणार?आज जवळ-जवळ २ दिवस उलटले असून ना त्याचा कॉल ना मेसेस...... कसा असणार तो ? याच सर्व बाबींची उजळणी करत,तिने नव्याने त्याचा भावनेचा सन्मान करत त्याला अन-ब्लॉक केलंच.


     नेमकं आता अन-ब्लॉक जरी केलं असलं तरी,मीच स्वतः का बोलू ? याचं क्रमाने ९ तास तो ना ती कुणीचं कुणाशी बोललं नाही.या ९ तासांत प्रियकरास एक नाव संजीवनी जरी प्राप्त झाली असली तरी,एकदा आत्मसन्मानाची पायमल्ली झालेली असतांना पुन्हा नव्याने का तो बोचट प्रयन्त का करावा; म्हणून प्रियकर आपला शांतच होता.


     
तुझं माझं जमेना,नि तुझ्या-विना करमेना.....


नि एकदाचां प्रियसीचा मेसेज आलाच......काय रे कसा आहेस ? हे तीचे शब्द होते,प्रश्न जरी एका वाक्याचा  असाल तरी त्या मध्ये पवितरमय भावना दडलेली होती. मनाला एकदम हळवं करत प्रियकराने मेसेज फक्तं पॉप-उप विंडो मधन बघत आपण खूप कामात व्यस्त आहोत, असा निष्ठूर प्रयन्त केला.आता दिवसभरातीळ अनेक कामांची औपचारिकता आटपोत साहेबांनी पुन्हा डोकं बाजूला सारत मनानी प्रियसी सोबत संवाद साधला.हा संवाद नेमका काय होता, हे वगळता संवाद नेमका कसा होता, हे बाकी तुम्ही-आम्ही अधोरेखित केलें पाहिजे.

प्रियसी : तुझ्या कडे वेळ आहे का ? मला थोडं बोलायचं होतं.....
प्रियकर : ***(प्रियसीचं नाव घेत) नाही तर.....के केलं मी आता....😐
प्रियसी : का बरं तू काही वाईट केलं असा संशय आहे का तुला ?
प्रियकर : नाही नाही बोल ना......☺
प्रियसी :अरे....!मला ना कसं तरी च वाटत आहे,खरं तर तुझी काहीच चूक नाहीय हा.....हे सगळं काही क्षणिक होत हा तू उगाच मनाला लावून घेऊ नकोसं.........😊
प्रियकर : मला कळेल का ?
प्रियसी : काय तर ?
प्रियकर : मला ब्लॉक करून तुम्ही काय सिद्ध नि साध्य केलं ?
प्रियसी : माझी मर्जी,मी काही पण करेल....😂😂😂
प्रियकर : ठीक आहे....आल्या जीवनात मला ब्लॉक करणारी तू पहिली ठरलीस.....त्या बद्दल आपले मनस्वी अभिनंदन🙏
प्रियसी : मी पण आज वर ५६ लोकांना ब्लॉक केलंय.....परंतु अन-ब्लॉक होणारा तूच पाहिला हा.....
 In continuations, let us assume.......


अश्या प्रेमळ शब्दांचा मारा करत प्रियसिने त्याला अन-ब्लॉक करत सर्व परिस्थिती पूर्णतास आणण्याच्या प्रयन्तनात ती मग्न होती. आता अनेक आश्वासनांचे पोकळ-पूल बांधत ती रात्र समोर जात होती.सरते शेवटी आता हे असले ब्लॉक करणं, पून्हा नव्याने होणार नाही ना ? याची मात्र प्रियकराने साक्ष घेतली होती.मध्यंतरी त्या६० तासात के नि कसें झालें, यांची लांबच लांब चर्चा झाली नि शेवट मात्र गोड च झाला.म्हणून चं अस अधोरेखित  कारावास वाटतंय की....

      🔥 "तुझं माझं जमेना नि तुझ्या-विना करमेना"🔥

झालेल्या चूक त्यांनी आपलंसं म्हणून पदरात घेत, एक नाविन्य-पूर्ण रचना करण्याचा मानस बाळगला. हे ऐकुन एका लेखकाच्या स्वरूपाने मला फार बरं वाटलं,कदाजीत तुम्हाला ही आवडेल हीच अपेक्षा....
🙏धन्यवाद🙏

कारण,
तुझं माझं जमेना, नि तुझ्या विना करमेना.....!

पुढील त्यांचा रंजक प्रवास लवकरचं आपल्या समोर प्रस्तुत असेल.


Wednesday, 3 October 2018

ती आणि तो प्रकरण -३ "तू मला ब्लॉक केलं; त्यावर मी हा ब्लॉग केला.....!" 😢

         


                          आता या गोष्टीला येणाऱ्या वादळाची चाहूल म्हणा किंवा केलेल्या प्रयत्नांना येऊ घातलेलं उपेक्षित यश म्हणा; येणाऱ्या अल्प अवधीतच त्याची सुव्यवस्थित असलेली संपर्काची यंत्रांना कोलमडणार होती.आता त्यास कारण ही साजेसं आहे बरं का....? खरं तर हा सर्व प्रकार घडणं ही त्या स्वकीय समजल्या जाणाऱ्या परंतु दुतोंडी असणाऱ्या तोतया कान-भरणी करणाऱ्या लोकांची विजयाची गुडी च म्हणावी....!झालेला घात हा इतका प्रखर होता की घटनेची पळताळणी तर दूरच नि काही क्षणातच एकमुखी निर्णय झळकला तो म्हणजे की त्याला ब्लॉक करण्याचा.

      
                 संशयाचे धागेदोरे बळकट होण्यास तशी कृत्रिम स्थिती ही निर्माण करण्यास अनेक डाव्यांचे आणि जवळची समजल्या जाणारी परंतु जवळ नसलेल्या सभ्य कलाकारांची महत्वाची भूमिका होती आणि याचं पार्श्वभूमीवरिल तिने त्याला ब्लॉक करत सर्वत्र त्यांचे डाव फळा आले होते.आता फक्त ब्लॉक करून ती जरी मोकळी झाली असली तरी हा अर्थातचं तो प्रियकर काही सरळ या प्रकरणाचा "इतिश्री" ही करू इच्छित नव्हता चं. खर तर त्याचा विश्वास च होत नव्हता की तिने त्याला ब्लॉक केलंय म्हणून तरी हा त्याचा पोकळ विश्वास च म्हणावा हा कारण वास्तविक तो खरंच ब्लॉक झाला होता.

   
                तसं इतिहासात डोकावंतांना एक मात्र नक्किचं प्रतिबिंबित होत होतं की इतरांना झुरवणारा आज स्वतः च झुरत होता आणि त्याचं विचारम्य मग्न अवस्थेत स्वतःला च प्रश्न करत  बडबडत होता की "की काय खरंच तिने मला ब्लॉक केला का......?" आणि याचं आशावादी प्रश्नावर आपलेच अकलेचे तार-तम्य जुळवत संबधितांकड धाव घेत तिचे व्हाट्सएप चे अकाउंट सतत उघड-बंद करत तिचा प्रोफाइल फोटो दिसतो का तुम्हाला....? बघू तर द्या असं चित्त थरारक घोष वाक्ये ओघत सर्वत्र हाहाकार गाजवत धुंद होऊन गेला.आज केवळ नि केवळ त्याच्या च मूळ जी अनोळखी लोक तिच्या जवळ आली होती तीच आता त्याची खिल्ली उडवत माजा बघत,संस्काराचे धडे गाजवत होती.


                सरते शेवटी हे सुद्धा म्हत्वाचेचं म्हणावें लागेल,कारण ब्लॉक करणं ही किती सोपं असत ना.......परंतु असं ब्लॉक करून स्वतः जरी मोकळं आपण होत असलो,तरी त्या ब्लॉक होणाऱ्या समोरील व्यक्ती ची मनाची बैचैन अवस्था चक्क आज त्यानें स्वतः अनुभवली असावी;करण याचं महाशयाने या पूर्वी अनेकांना ब्लॉक करत तरसवत मोठं-मोठे पराक्रम गाजविले होते चं. आता या प्रकरणांतून त्याने धडा तर घेतलाच आणि त्याचं बरोबरीने मनाशी पक्का निर्धार ही केला की;या नंतर अस ब्लॉक करून उगाचंच कुणाच्या भावनांचा खेळ मांडणार नाही.

           आता जे झालं ते परब्रम्ह जरी प्रगटले तरी पूर्णतः वर येईल असें सुद्दृड सूर तर नव्हतेच,असो या सर्व प्रकरणात तिचं काय नि कसं? हे जरा बाजूला सारून आपण जर प्रियकरा कड डोकावलं तर लक्ष्यात येईल की ज्याला आपल्याला नुकसान अस म्हणता येईल ते फक्तं नि फक्तं त्या निर्दोष प्रियकराचंच.कारण प्रेमापोटी आंधळ्या प्रियकराने केलेला तो  ३ ते ४ दिवस केलेला निश्फल अन्नत्याग त्यास चांगलाच भारी ठरला, कारण मानसिकतेने खचलेल्या प्रियकराला या अन्नत्यागा मुळ शारीरिक बेचैनता निर्माण झाली आणि यातन मग पुढं चीड-चीड करणं,कुणावरही उगाचंच रागावणं असें निरर्थक प्रकार घडू लागले आणि याचेच दुष्परिणाम म्हणून प्रियकराला सावरणारे चं त्यांच्या या तिरकस पद्धतीमुळे जरा लांबच झालें.

          आता तिने जरी ब्लॉक करून हे प्रकरण मोडत नेण्याचा पर्यंत केला असला तरी हे काही सहज घडून येणार्या-पैकीं नव्हतं.........
   
            खरं तर ब्लॉक केल्यानं फक्त पोकळी निर्माण हिते ती त्या सु-संवादाची,काही तिसऱ्या घरी उसर्या करणाऱ्या लोकांच्या कान-भरणी मूळ हे जरी सद्यस्थित निर्माण झालं असलं तरी त्या नात्यांची सुंदरता ही आज ही त्यांचा मनात तीच होती जी की आधी असावी, घाई-घाईने घेतलेले निर्णय हे कितपत यशस्वी ठरतात हे आपल्याला चांगल्या प्रकारे उमजते ते समजून घेण्या इतपत आपण वरिष्ठ आहातच. 

            
          घडलेला हा प्रकार फ़क्त त्या दोघांन पुरताच मर्यादित नसून बहुतांश प्रकरणात तुम्ही-आम्ही बघितला आहेच.......आता हेही साहजिक असेल की या प्रकणात आपण फक्त नि फक्त एकाच बाजू बघितली अजून ही ब्लॉक करून मोकळ्या झालेल्या प्रियसीची अवस्था ही आपणांस रहस्यमय चं असणार आहे......

        सरते शेवटी मला एकंच सांगावंसं वाटेल की ब्लॉक केल्यानं फक्त अंतर हे बोलण्यातील वाढेल ना की त्या सुंदर नात्यातील..... आणि हा....!!!राहिला प्रश्न तो प्रोफाइल फोटो न दिसण्याचा तर त्याची आधीच प्रियकराने व्यवस्था सज्ज करून घ्यावी;अर्थातच २-४ जवळची असें जिवाभावाची मंडळी तैनात ठेवावी की जे वेळो-वेळी नि पदो-पदी प्रियसीच्या सर्व हालचालींच अजून नि थेट प्रेक्षपन करू शकतील..... 

Feeling Alone.......




चला तर मग प्रियकराच्या मनाची बैचैन अवस्था रागावणारी ही काल्पनिक रहस्यमय कथा आज इथंच अल्पविराम घेऊ इच्छिते.....
धन्यवाद😃

Saturday, 15 September 2018

ती आणि तो प्रकरण-२"तू जेवढ समजतेस ना तेवढा वाईट नाही ग मी".......!



       सुखोस्तर साध्य होईल,अशी कुठलीच साधिका या भू-तलावर तरी साध्य होत नाही.असे बरेच दा थोरा-मोठ्यांच्या सूचक वाणीतन ऐकण्यास आले बरें, तेच त्याला अनुभवी आले असावे. आता लक्ष जरी स्पष्ट झालं असलं तरी ,अत्यंत खळतर मार्मिकतेच्या मार्गानं स्वतःला सावरत मार्गस्थ करणं काही सहज नव्हतं.तरी तिला साध्य करण्यात आता एक प्रियकर म्हणून तो प्रयन्त-वादा वरती नव्यानं विश्वास ठेवतं रुजू झाला.

    मागील भेटी-मुळे त्यांनी आता किंचितशी जवळीकता साधली होती,याचं जवळीकतेला साधर्ममय ठरवतं, ते एकमेकांना त्यांच्या व्यग्र जिवन शैलीतन वेळ देऊ लागले, गप्पा रंगवू लागले.या सर्व प्रकारणात दोघांनी पण तारेवरची कसरत केली,कारण आता रोज नव्यानं एक कथित नाट्य हे त्यांच्या समोर दस्तक देत होत.

    खरं तर भेटत हे होते,मने यांची जुळत होती,तरी जळत इतरांची होती."मला न तुला घाल कुत्र्याला",अश्या विवेकमय बुद्धिमत्ते चें धनी आता या दोघांवर तिरडी नजर ठेवून होतें. तंत्रज्ञानाने अद्यायत असलेल्या CCTV सिस्टिम पेक्षाही ही काटेकोर तापशीलतेचा पंचनामा यांच्या कडन पसरल्या जाऊ लागला होता,हे सगळे उद्योग करण्या इतपत वेळ ही त्यांच्या कडं होतीचं तर याच वेळेचा सदुपयोग करत त्यांनी विनामूल्य त्यांची प्रसिद्धी जोर धरू लागली होती.आता THIRD PARTY कडन जस्यास तसें फार क्वचित च एकाला मिळत तसंच इथंही अनुभवास आलं.प्रत्येक गोष्टीला दोन गोष्टी नव्याने जोडत ते त्यांची प्रसिद्धी जोरात करीत होते.असो आता हे तरी पुरेच.....



   काही बहाद्दरांनी तर जखमेवर मीठ चोळण्याची बोचरी कामे हातात घेतली होती, ती म्हणजे कान भरणी ची.नको तिथं नाक खुपसणारी ही लोकं आता त्या प्रियसी कंड, केव्हा निमित्ताने तर केव्हा औपचारिक निमित्य बनवत भेटी-गाठी घेऊ लागली होती. आणि निघता निघता का होईना परंतु आपल्या वकिलीचे विनामूल्य सल्ले देत ते खलील प्रसंग कथित करून आणत होतें....


हे बघ...माझं काही नाही हा!
परंतु तो मुलगा ना मला काही ठीक वाटत नाहीय,या आधी पण त्याचे बरेच प्रकरण आम्ही स्वतःच मिटवली आहेत ग. आणि तू किती छान आहेस आणि तो बघ कसला आला.....
काही चं स्टॅण्डर्ड नाही त्या मुलाचं....
तुला तर विराट च मिळावा ग......(तेवढे बरे विराट आणि अनुष्का यांचं लग्न झालेलं होते नाही तर या बाईंनी विराट कड सुद्धा शिफारस केली असती कि काय ?)
नको विचार करू याचा,नाही बघ हा तू शेवटी तुला च निर्णीय द्यावा लागेल. चल तर मग मी निघते हा,काळजी घे....!!!

   झालं हे ऐकून ती तर चालती झाली बरी, परंतु जाता-जाता अलगतशी ठिणगी लावत तिने आग लावली आणि आपलंसं मोकळी चं झाली खरी.परंतू आता प्रश्न होता तो त्या तोतया मुलीने पेरलेल्या अविश्वासाचा, की खरंच तो मुलगा अर्थात प्रियकर वाईट असावा,कारण इतके सारे लोकं खोट तर बोलणार नाही ना?याच विचारात तिने आता त्याचा संपूर्ण पंचनामा हाती काढला होता,त्याच्यावर नको नको ते संशय घेत त्याला धाऱ्यावर घेत कुठं तरी प्रेमाने चाललेला हा निर्मळ प्रवास याचं कान भरणी प्रकार मुळं च बिथरला होता.

   एक नव्हे, दोन नव्हे तर अनेक उलटं-सुलट चर्चांना आता ती सुद्धा सकारात्मक प्रतिक्रिया देत त्यालाचं वाईट ठरवतं सर्वत्र पाणी फेरत गेली.

   वास्तविक बघता खर-खोटं काय याची प्रमाणता काय हे बघणं इथं महत्वाचं जरी असलं तरी आता दोघांच्या पण मनाला तळा गेलीच होतीं.असो झालेला प्रकार हा पूर्णपणे अनपेक्षित असून एक नवीन मोड आणणारा होता,आता समोर या नात्याला काय दिशा मिळणार हे तर गुलदस्त्यात चं होत.असो या घटनेवर प्रियकर स्वतःहून आपलं मौन सोडण्या इतपत बळकट नव्हता आणि ती आता काय   करत असणार याचं प्रश्नांच कोड मणी बाळगत तो फक्त बोलत गेला......की,


                            "तू जेवढ समजतेस ना तेवढा वाईट नाही ग मी".......!


 
हाच तो कान भरणी चा प्रकार....  



         👫असो तरी आता त्यांच्या हातात काही नव्हतं शिवाय तिला झुरल्या शिवाय...!
असो  आपण  काय शेवटी जे दिसत ते नमूद करून मोकळे झालोत आणि त्यांच्या नात्याला नव्याने कुठलं स्वरूप प्राप्त होणार याच्याच विचार करित पुढील  बघत बसलो.  



Friday, 31 August 2018

ती आणि तो...... प्रकरण-१."आम्ही दोघे गप्पचं होतो तरी ती चौघें गप्पा रंगवत होते"



     एरव्ही त्यांचं ते भेटणं हे काही नव्यानं नव्हतं, या आधी ही बरेच योगा-योगाने म्हणा किंवा जोर-जबरदस्तीने का होईना भेटीगाठी होत असत.या सर्व मांदियाळीत स्वतःविषयी कमी आणि इतर मंडळीच बोलकी रंजक टिप्पणी असे.

     खरं तर होऊ घातलेली ही भेट काही जवळीक साधं घातलेल्या मंडळींच्या विशेष प्रयत्नाने आणि अनेक टोचक समजुतीने साध्य होत होती.या भेटीचे पुरेपूर श्रेय हे फक्त आणि फक्त त्याचं दोघांचे आहे यात कुठंलीच दुमत नसावी.

    तसं बघता आपल्या मूळे बरेंच दा आपल्याचं सावंगड्यांना ईश्वरा सारखी प्रतीक्षा घालविणारा हा प्रियकर आज आपल्या प्रेमा साठी मात्र वेळेपूर्वीचं दारावरती हजेरी देऊन सलामी देत होता. भेटण्याची वेळ केव्हां उगवते नि जेव्हा नाही हीच बाब आज त्याला गंभीर समस्या म्हणून त्यांच्या मनात खतबल घालवत होती, कारण तर ती येणार होती.जी परिस्थिती या टोकाला होती तिचं बोंब दुसऱ्या टोकाला,तिकडं ही खतबल च मन खात होती.वेळेचा विपर्यास करणारे दोघे आज वेळेचे पुजारी होऊन बसले होते.याचं नवल वाटून घ्यावं ठेवढं पुरेच.

   आता कुणा साठी ही न थांबणारी ती वेळ आज ही ठराविक गतीने आल्या प्रमाणे जात ही होती.ठरलेली वेळ उगवली आणि शेवटी दोघे भेटले च एकदाचे.दोघांच्या पण मनात आनंद हा गगनात न मावणारा होता,स्मिथ हास्य उमटवत पुढील कार्यक्रमास ग्रीन सिग्नल रुजवला.ते दोघे जरी एक-मेकांत मंत्रमुग्ध असले तरी मार्गानं जाणाऱ्या प्रत्येक वाटेकरांची तिरडी नजर त्यांच्या वर दत्तक देऊन होती.परंतु या सर्व प्रकाराला घाबरून पलायन करण्या इतपत ही ते पोकळ नव्हते,साऱ्याच परिस्थिती ला दोन हात करत ते शेवटी त्या कॉफी कॅफे ला पोहचते झाले.

   बऱ्याच अनपेक्षित औपचारिकतेंच्या नंतर स्थानापन्न होत ते केवळ एक-मेकांना बघतच राहिले,या सर्व भानगडीत केव्हा तो वेटर येऊन ठेपला याचं भान च राहाल नाही.दोन आवाज देत त्यांनी त्यांना डीचकवींन्याचा आयशवी पर्यंत त्याच्या कडक हाऊन गेले होते.शेवटी त्या वेटर नि टेबल वाजवीत त्यांना त्या बांधनातन बाहेर खेचलं. तरी या दोन जीवांचा जीव एक-मेकांना बघण्या वाचून काही सुटत नव्हता.त्रासून त्या वेटर नि पुन्हा  उच्च स्वर गवसत ऑर्डर घेतली आणि बिचारा चालता झाला.

  ऑर्डर येई पर्यंत तर यांना काही काम नव्हतंच म्हणा शिवाय एक दुसऱ्यांना बघण्या वाचून आणि याच दुर्लभ क्षणाचा फायदा घेत त्यांनी आपली मनमानी पूर्णत्वास नेली.हळूचकन घाबरट आवाजात वेटर मध्यस्थी घालत निमित्य-मात्र ठरलेल्या कॉफी ची सांगता केली.

   या संपूर्ण भेटीतून मला एकच उमजल होत की, वास्तविक एक शब्द ही न पुट-पुटता त्यांनी बऱ्याच गोष्टी ह्या घडवून आणल्या होत्या आणि या सर्व प्रकरणाला कारणीभूत ठरले ते त्यांचे डोळे,जे तुम्हां आम्हां सर्वांनाच आहे फक्त त्यांचा उपयोग योग्य रित्या करता यावा जसे की या दोन निर्दोष जीवांनी या कॉफी च्या भेटी मात्र केला आहे.
खरंच.....
        

             "ते दोघे गप्पचं होतें, परंतु ती चौघें गप्पा रंगवत होते"



       औपचारिकता म्हणून वेटर नि बिल टेबला वरती आणून ठेवलं होतं,थोडी का होहिना पण आपल्या प्रियसी समोर वट मारावी या गडबळीत प्रियकरानं सेंट्रल आणि स्टेट GST सकट पूर्ण बिल मोठ्या दिमाखानं दिल सोबत त्या वेटर ला टीप ही टेकविले.

                चला तर आपण निघायला हवं.....


     असं ढासळत वाक्य तीनं उद्गारल आणि ते दोघे ही तिथन चालते झालें. परतीच्या प्रवासात सहज बोलता बोलता त्यांनी पुन्हा नव्यानं भेटण्याची आस त्यां दोघांनीही दर्शविली होती.
आता मानातन तर दोन्ही बाजूला पण प्रेमाची त्सुनामी गतिमान होत होती.


  असो ही तर त्यांची पहिलीच भेट होती,यात माझ कुठलाचं पात्र नाही फक्त जे मी त्या कॉफी कॅफे च्या अलिकडील बाकावर बसून चित्रित केलं तेच मी आपल्या समोर मांडण्याचा सढळ पर्यंत केला आहे.आणि ते दोघे असेच भेटत राहो हीच माझी ईश्वर चरणी प्रामाणिक प्रार्थना असेल.





हेच ते दोघे....



तर मग चला या प्रकरणात इथंच पूर्णविराम देऊन आपण सर्व त्यांच्या पुढील भेटीची वाट बघूया...


टीप: सदर प्रकरण मी रेखाटण्याचा पर्यंत केला आहे,या प्रकरणात कुणाचीही भावना दुखविण्याचा माझा कुठलाचं हेतु नाही;असल्यास तो केवळ योगायोग चं.
आणि हा प्रसंग एक काल्पनिक असून माझा आणि माझ्या संबंधितांचा कुठलाही रोल नाही.



Tuesday, 7 August 2018

"जे होते नि जे आहे यात केवढा फरक"

    


                  खरं तर आपण स्वीकारलेली कार्याची जवाबदारी लक्ष्यात घेता; ते कार्य पूर्णत्वाला नेण्यासाठी लागेल तो आटापिटा करत कुठलीच कमतरता भासणार नाही याची काळजी घेत होतो.
    तसं बघता संघटन घडवून आणण्यासाठी; आवश्यक ते धडे ही आम्ही बाल्य अवस्थेत च संस्कार रूपाने अंगिकारले होते;यात स्वतःचीच पाठ थोपटून घेत नाही तर ज्यांनी आमच्या वरती जे धडे गिरवले त्याचाच हा स्वबळ दाखला होता.

           नियोजना प्रमाणे तर सगळं काही सुरळीत च ठरलं होतं,हवी ती पूर्व कल्पना ही सर्व उच्च स्वाभिमानी मंडळींना होतीचं. भूतकाळातील कार्यांची यशस्वी इतिहास बघता तसं उगाचंच लांच्छनास्पद हिनवणार कुणी नव्हतं;परंतु त्या सामूहिक कार्यच स्वरूप बघता आमच्या सोबत वयक्तिक वाद निर्माण करत त्या सर्व समूहाला आमच्या विरुद्ध भडकविणारे अनेक चेहरे आम्हाला अडत होती.तरी संस्कारांची पायमल्ली न हाऊ देता; आपल्या सर्व आत्मसन्मानांचं विसर्जन करीत आम्ही तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेऊनच हवी ती पाऊले उचलीत होतो.
   
       आमचे सर्व पाऊले ही कार्याला सिद्धीस नेण्याच्या दिशेनं वाटचाल करणारी होती,तरी त्यांच्या वर दोषा-रोपण करण्या इतपत आम्ही उंची गाठली नव्हती.शब्दाने शब्द वाढतो म्हणूनच आम्ही काही काळ बऱ्याच गोष्टी गुलदस्त्यात ठेवल्या. या सर्व प्रकरणात मला त्याच्या आभ्रूस्ट त्या मी पणाची अनेक उदाहरणे बघायला मिळाली.
  
      दिवसांवर दिवसे आता ओलांडत होती आणि ती नियोजित वेळ; भर अंधारलेल्या गोंधळात त्या अपयशाची चाहूल देत होती.आता अर्धवट वाटेवरन सर्वांना राम-राम करणाऱ्यांन मध्ये आम्ही तरी मोडत नव्हतो आणि पलायन करून इतपत लाचार ही नव्हतो.

    ज्या प्रमाणे नाण्याच्या दोन बाजू आसतात ना,त्याच प्रमाणे या घटनेच्याही दोन बाजू होत्या.आमच्या बाजूने आम्ही सहल काही सावरण्यात भर देऊ इच्छित होतो तर दुसरी कंड अति हुषार समजल्या जाणारी ती उच्च आभ्रूस्ट मंडळी स्वतःचा स्वाभिमान जपण्यात मग्न होती.तस बघता व्यक्ती हा कुठल्याही क्षेत्रातील असो समर्थकांनच्या सोबतीने त्याला प्रति-स्पर्धक ही त्याचं संख्येने लाभतात,असलंच काहीसं समीकरण आता मला लागू होणार होत.
    
    वेळोवेळी स्तुती-सुमने गाणारी जवळ जवळचिंच मंडळी आता अफजल खानच्या भूमिकेत येऊन पाठीवर वार करू लागकी होती.त्याच्या या बदलत्या भूमिकेचे संकेत ही आम्हाला आधीच सूचक झालें होते परंतु माया रुपी अति-विश्वासाने आम्हाला आंधळं स केलं होतं.

   कुठलंही काम असो आधी त्या कामाचा/कार्याचा उद्देश हा सार्थकी लावणे हाच आमचा ही प्रामाणिक उद्देश होता; परिणामी याच उच्च-ध्येय वाटचाली मुळं पदरी आलेल्या नाव  नौकिकता फळा आली असावी.आणी याचं नावाचा तिरस्कार करणारी मंडळी तीव्र संखेने वाढीस लागली होती,हा सर्व प्रकार आमच्या समोर घडत असतांना सुद्धा आम्ही त्या अति-विश्वासाच्या विश्वात भरावलेलो होतो आणि अंतिमतः स्वकीयांकडनच भ्रमनार्थ होत राहिलो....
      
         आता या सर्व बाबींचा विचार करता एक च बोलासव वाटत की,
       
          

          "जे होते नि जे आहे यात केवढा फरक"....!


    
         हाच फरक जर आमच्या ध्यानीं-मनीं त्या क्षणी आला नाही  परिणामी पुन्हा एकदा आम्ही भ्रमनार्थी पडलो.आता हीच घोडचूक लक्ष्यात घेता योग्य वेळी त्या सर्व पाठीवरच्या वारकऱ्यांना अर्थातच शिखंडी अफजलांना ओळखा आणि आपली सुटका करा.....!



Add caption

Monday, 4 June 2018

आता जाता जाता हा निरोप शेवटचा नसावा आणि तुमचा-आमचा ऋणानुबंध असाच वाढीस जावा.....



         मन भरावलंस होतं, तस माझ्या रक्तातील नात्यातल कुणी मला सोडून जात नव्हतं जेथून ते जात होते अर्थात ते महाविद्यालय ही कायमरूपी माझं नव्हतं.परंतु तरी माझ्या मनाला के झालं होतं की ते हळहळत होतं आणि आपल्याला कुणी तरी या  प्रवासाच्या भरकटलेल्या वाटेवर एकटस करून जात आहे याची हळूच चाहूल करून माझ्या त्या निर्दोष डोळ्यांना अश्रूमय करतं होत.आज वर फक्त मी असं एकल होत की रक्ताच्या नात्या पेक्षाही प्रेमळ- विश्वास रूप घेऊन जन्माला आलेली नाती ही जास्त मजबुतीची असतात आणि याचाच दृष्टांत मला या PMC वरील हालचालींनी गेल्या ३ दिवसां पासन मिळत होता.
 
         प्रश्न हा अधिकारत्वाचा होता;परंतु त्यांनी आपलसं करून आपुलकीने तोच प्रश्न सोडविता-सोडविता आम्हाला अधिक जवळून समजून घेतलं आणि त्यांच्या याच आपुलकी आम्ही पुन्हा एकदा नव्या चेहऱयांच्या साथीने शैक्षणिक प्रवासाची सुरुवात करण्यास मार्गस्थ झालो.

        भर लांबच लांब त्या पुरातन इतिहासात जाण्याची काही गरज ही  नाही हो...!
सण २०१६-२०१७ या शैक्षणिक वर्ष्या मध्ये माझी थेट दुसऱ्या वर्ष्यात यंत्र अभियंत्री या अभ्यासक्रमा अंतर्गत श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालया,शेगांव ला प्रवेश निश्चिती झाली.महाविद्यालयात दाखल झाल्या पासन त्या सुरवातीच्या काळात तसं बघता भव्य-दिव्य आणि प्रशस्त इमारतीच जिवंत उदाहरण हे महाविद्यालय होतं तरी त्यामध्यें आपलसं समजणार आणि जवळीकता साधणार कुणी नव्हतंच.एका बंद रूम मध्ये कैद्या सारख्या बंधीत अवस्थेत मी कुठं तरी कुण्या शिक्षेस पात्र झालो की काय याच भावनेत कसे तरी ते दिवस निभावत होतो. आता बघता बघता माझ्या सारखेच बरेच कैदी जमू लागले आणि कैद्याचीच काय होईना;परंतु आमच्या त्या अनोळखी चेहऱ्यांची एकटे पणा घालवणारा एक गट तयार झाला.

       श्रींच्या कृपेने सगळं काही सुरळीत चाललं होतं;तोवरच एके दिवशी आत्मविश्वासाने अधिकच सक्षम असणाऱ्या त्या senior नामक वरिष्ठ मंडळींची फौज आमच्या वर धाऊनच आली होती,आता त्या दमटलेल्या प्रसंगात आम्ही बिचारे सगळे आप आपला जीव मुठीत धरून बसलो होतो. सुरवात झाली ती स्वागत करतच तोवर म्हणाले की आले तर भेट घ्यावचं म्हणे आणि नंतर झाला चालु तो कुणाला न सुटणारा Introduction चा भडिमार. आता हा प्रसंग आम्ही हा असला प्रसंग या आधी बघितला नव्हता; परंतु शब्दास मान देत घाबरत त्या भीतरलेल्या आवाजात सगळ्यांनी आप-आपला परिचय दिला.या सर्व प्रकरणावर टिप्पणी देत त्यांनी म्हटलं की तुम्हाला अजून बऱ्याच काही शिवायचं आहे आणि शिकवायचं आहे असं बोलतं तो दिवस मावळला आणि आम्ही मोकळा श्वास घेतला.

           बघता बघता आता बरेच दिवस आम्हांला या महाविद्यालयात झाले होतें, फक्त चेहऱ्याने का होईना आम्ही एकमेकांत राहून इतरांना सुद्धा ओळखू लागलो होतो. याच सर्व प्रकारात आमच्यातील आणि seniors मधील भेटी ह्या वाढीस लागल्या होत्या.आता हक्काने रागात का होईना पण आम्हांला हाक मारून बोलणार आणि  बोलवणार कुणी होतं, हे सगळं काही आता मनाला मोहक आणि अभियांत्रिकी ला पोषक अस वाटणारं वातावरण आम्हांला SSGMCE मध्ये निर्माण झालं होतं.

          मदतीचे सूर गवसत सुरुवात तर झाली होती; परन्तु त्यांनी केव्हा पोकळ आश्वस्त न करता वेळोवेळी तत्परता दाखविली. मग त्या मागील वर्षी च्या Notes असो की Soft Skill ला लागणारे Formal पासन तर Tie पर्यंत त्यांनी काहीही पुरवण्यात कसलीच पळता भुई केली नाही.बरेचदा Syllabus मधील काही points कळायचे नाहीत;तर तेही ते आम्हांला वेळात वेळ काढत समजवून सांगत.आता याच सर्व काही गोष्टी मला एकटे पणाची जाणीव करून देतात;यांनी यातूनच पुन्हा होतो तो माझा भ्रमनिरास चं.....

         शेवटीं जाता जाता त्यांनी आम्हाला बरेंच कानमंत्र दिले त्यामध्यें Placement पासन तर भावा सगळं काही कर पण केव्हांच प्रेम- प्रकरणात अडकू नको असे सल्ले देत त्यांचे अनुभव मला नकळत सांगितले. आज पर्यंत ज्या प्रकरणां बद्दल मला कल्पनाही नव्हती त्या बद्दल ची सगळी सूत्रे त्यांनी माझ्या आमच्या हाती देत;आम्हाला जवाबदारी ने भरगच्च भारी केलं होतं.

       जीवनाच्या या रोमांचित प्रवासात अनेक आलेत,काही निघून गेलेत तर काही कायम स्मरणात विराजमान झालेत.यात सर्व Senior रुपी मित्र तर काही  Seniority च्या पलीकडील मैत्रीनी सदैव आमच्या स्मरणात निश्चितच विराजमान होऊन आहेत.

      आता जाता जाता बऱ्याच बाबी तुम्ही आम्हांला सहज देऊन गेलात, आता याची परतफेड करण्याची आमची जबाबदारी आहे यात वावगं अस काही नाही;परंतु आज स्वताच तुमचा हा प्रेमळ Junior अनेक स्वप्नांनी जरी भरलेला असला तरी आपणांस काही सप्रेम भेट देण्यास सक्षम नाही.

      शेवटी आपणांस निरोप पर भाष्य म्हणून आम्ही,आई तुळजाभवानी च्या चरणी मी एक च प्रार्थना करू इच्छितो की......


     "आता जाता जाता हा निरोप शेवटचा नसावा,
आणि तुमचा-आमचा ऋणानुबंध असाच वाढीस जावा...
             असाच वाढीस जावा"........


      🙏आपल्या सर्वांचे आमच्या आयुष्यात पदार्पण केल्या बद्दल मनस्वी आभार व आपल्या पुढील उत्कर्षमय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा🙏.....

Thursday, 17 May 2018

आणि जोड्या जुळतंच गेल्या...

         मी आपलं निवांत बसलो होतो,आज झालेल्या पेपरच ४० गुणांचं सांख्यिक समीकरण मनात खतबल घालीत होतं.बाजूला हळूच शर्माजी यांची बैठक लाभली,आणि तेच आपलं गेलेल्या सुरेख दिवसांचं सुखात्मक विचारमंथन करीत आम्ही वेळ घालवत होतो.
       हे सगळं होऊ घातलं असतांना 
घड्याळ्यात संध्याकाळचे ६ वाजताच,आम्ही ना काही वेगळाच देखणा देखावा पाहाल, आता खरं तर आम्ही फक्त ते बघूच शकत होतो कारण अद्यापही तस करण्यासाठी आम्हाला तरी कुणी मिळालं नव्हतं.मुलांच्या वस्ती गृहातन एकांपेक्षा एक भारदस्त पेहराव करीत मुलं पलायन करीत बरोबर त्या PMC नामक केंद्र स्थळावर,एकदम बारीक निर्जीव आवाजात न त्या स्मिथ-हास्याने सुसंवाद साधत होते. ही सगळी भानगड आम्ही उघड्या डोळ्यांनी निष्पापी भूमिकेत बघत विचारमय होत गेलो कारण एक नाही दोन नाही तीन नाही तर अनेकांची हीच गत आम्हांस आज उमजली.
     
      आता पर्यंत आम्ही एकच बाजू बघून होतो,खर तर तोच आशेचा किरण समोरील व्यक्ती अर्थातच त्या मुलीवर सुद्धा स्पष्ठ दिसत होता.GPS यंत्रांना सुद्धा काय location देईल एवढे जागोजागी चे update हे एकमेकांना देत समोर येत पुन्हा स्मिथ हास्य देत मानतच बरच काही बोलतात.आता गंमत अशी होते की  यांना वाटत की आपल्याला कुणीच बघत नाही,म्हणून हे दोघे होईल त्या घाई घाई ने पलायन करण्याचा केविलवाणा प्रयन्त करतात,परंतु प्रसंगी बिचारे अनेक अडचणीत सापडतात. एक तर ४-५ मुलांचा ग्रुप सतत त्या PMC जवळ तळ ठोकुनचं पहारेगिरी करीत सगळ्यांची सखोल माहिती आद्यायत करत असतात,जसे हे दोघे यांच्या नजरी येतात तसे अनेक संमिश्र प्रतिक्रिया नव्याने कानावर येतात.
      
       असो ही सगळी करण्यात मी बारकाईने बघत होतो,करण ऐका मागे एक बरोबर जोड्या जुडतचं  जात होत्या आणि हीच परिस्थिती माझ्या मनात अनेक प्रश्नांना सुगावा देत मला अस्थिर करत राहिली....
  
      सूर्य जरी अस्थाला येण्याची वेळ आली असली तरी या जोड्या जुडत जाण्याची काही सूर्या सारखी अस्थम्य वेळ नव्हती,शेवटी आमचे ते निष्पाप डोळे आता हे विचित्र चित्र बघू बघून थकले असावेत....कारण जोड्या जुळतच जात होत्या.... बरं का.....!.
      खरं तर आजवर आम्ही संगम हा फ़क्त नद्यांचा बाबतीत चं ऐकला होता परंतु परिस्थिती नुसार बदलत जाणाऱ्या संकल्पनेने हा अनोखा संघम आमच्या निदर्शनास येऊ दिल्या बद्दल आम्ही  त्या परीस्थितीला पोषक असणाऱ्या सर्व घटकांचे आणि विशेषतः त्या दोघांचे अर्थातच(तो आणि ति) यांचे शतशः आभारी आहोत...

Tuesday, 17 April 2018

अपेक्ष्यांच्या मायनगरीत......

हो....!अपेक्षा ही माया नागरी तर ठरत नाही ना ?

              

           असे म्हणतात की जर तुमचे मागील जन्मातील संचित पुण्यरूपी असेल म्हणून कदाजीत तुम्हाला मानव रुपी जन्म या भू तळावर प्राप्त झाला असावा,याच अनुषंगाने आपण सर्वच जीवन सार्थक करण्यासाठी जीवापाड आपेक्षेचे मोठे ओझे घेऊन आयुष्य पार पाडत आहोत.
           जीवनात एक ध्येयं साध्य होताच,आपण दुसऱ्या ध्येयावर गतिमान होतो,खरंतर हे करणं काही अयोग्य नाहीच,परंतु हे सर्व करत असतांना आपण चालू असलेल्या वर्तमान काळा मध्ये न जगात सरळ भविष्य काळात निघून  जातो.याला कारणीभूत आहे ती आपल्यावर रुजलेली विचारधारणा ती अशी की मला होऊ घातलेल्या शालेय परीक्षेत जास्त गुण घेऊन यशवंत व्हायचं आहे,आता यात काही वावग नाही कारण यशवंत व्हावं अस कुणाला वाटणार नाही,परंतु त्या उद्याच्या यशाच्या चिंतेत आपण आजचं का चिंताग्रस्त होऊन हे सुंदर जीवन निरार्थी ठरवतं जावं?
यशाची अपेक्षा बाळगत आपण सध्या स्थितीत चं अनेक स्वप्न रंगवतो आणि हळुवार पणे त्या बहुरंगी स्वप्नाच्या मायनगरीत इतके मग्न होतो की स्वतःच्याच वास्तविकतेला भुरळ पडतो.
          यश आणि अपयश ही काही कुणाची मक्तेदारी नसून,ह्या दोन्ही स्पर्धेच्या बाजूच म्हणव्यात परंतु या अपेक्ष्यांच्या मायनगरीत यश संपादित करण्याच्या दिशेने योग्य ती संघर्ष करण्या ऐवजी त्या यशाची का बरं चिंता करत बसलेलो असतो?आणि याच चिंते मूळे आपन आपले वर्तमान आयुष्य फक्त त्या अपेक्ष्यांच्या ओझ्या मूळे  सुंदर आयुष्य नकळत उध्वस्त होत राहत.अश्या या अपेक्ष्यांच्या मायनगरीत अनेक महानायक उद्याच्या यशाची योग्य काळजी न करता फक्त करतात ती चिंताच, खरतर अश्या सर्वांना अत्यन्त आवश्यकता आहे ती सखोल आत्मचिंतनाची,कारण आपण आशावादी धोरना वरण केव्हा चिंतावादी धोरणाचा अवलंब करतो हे कळतच नाही.
           आयुष्य क्षणभंगुर आहे,पुढील एका सेकंदाला काय घडणार हे देखील कुणास ठाऊक नसतांना का आपण उद्याच्या अविश्वासू यशासाठी आजच्या सुंदर वर्तमान जीवनाचा केवळ त्या अपेक्ष्यांच्या माया नगरीत का बरं त्याग करतो?यशाची चाहूल ही नक्कीच असावी परंतु तिला एक स्वयंघोषित सीमा जरूर असावी अन्यथा अपेक्षाच्या ओझ्याखाली योग्य ते  प्रयत्न सोडून; आपण स्वप्नांच्या  माया नगरीत मग्नधुंद होऊन केव्हा भविष्या सोबतच कसा आपल्या सुंदर अश्या वर्तमान काळही चिंतेत घालवतो हे सुद्धा आपल्याला कळतं ही नाही.
       आयुष्य खूप सुंदर आहे,फक्त ते जगण्याची कला आत्मसात करता येन हे महत्त्वाचं. आल्या जन्मी स्वप्नं जरूर बघावं परंतु ते परिपूर्ण करण्यासाठी योग्य त्या दिशेने संघर्ष करावा आणि अपेक्ष्यांच्या मायानगरी पासन जरा लांबच वावरव. यश किंवा अपयश हे एकमेकांवर आधारित आहेत,आज तुमच्या पदरी अपयश जरी असलं तरी नक्कीच अनुभवाच्या जोरावर तुम्ही सर्वांना हुलकावणी देत यशाच्या सर्वोच्च शिखरांवर विराजमान कराल,परंतु तुम्ही जर का त्या अपेक्ष्यांच्या मायनगरीत अडकलेत तर तुमचा होईल तो फक्त भ्रमनिरास चं...........!