आता या गोष्टीला येणाऱ्या वादळाची चाहूल म्हणा किंवा केलेल्या प्रयत्नांना येऊ घातलेलं उपेक्षित यश म्हणा; येणाऱ्या अल्प अवधीतच त्याची सुव्यवस्थित असलेली संपर्काची यंत्रांना कोलमडणार होती.आता त्यास कारण ही साजेसं आहे बरं का....? खरं तर हा सर्व प्रकार घडणं ही त्या स्वकीय समजल्या जाणाऱ्या परंतु दुतोंडी असणाऱ्या तोतया कान-भरणी करणाऱ्या लोकांची विजयाची गुडी च म्हणावी....!झालेला घात हा इतका प्रखर होता की घटनेची पळताळणी तर दूरच नि काही क्षणातच एकमुखी निर्णय झळकला तो म्हणजे की त्याला ब्लॉक करण्याचा.
संशयाचे धागेदोरे बळकट होण्यास तशी कृत्रिम स्थिती ही निर्माण करण्यास अनेक डाव्यांचे आणि जवळची समजल्या जाणारी परंतु जवळ नसलेल्या सभ्य कलाकारांची महत्वाची भूमिका होती आणि याचं पार्श्वभूमीवरिल तिने त्याला ब्लॉक करत सर्वत्र त्यांचे डाव फळा आले होते.आता फक्त ब्लॉक करून ती जरी मोकळी झाली असली तरी हा अर्थातचं तो प्रियकर काही सरळ या प्रकरणाचा "इतिश्री" ही करू इच्छित नव्हता चं. खर तर त्याचा विश्वास च होत नव्हता की तिने त्याला ब्लॉक केलंय म्हणून तरी हा त्याचा पोकळ विश्वास च म्हणावा हा कारण वास्तविक तो खरंच ब्लॉक झाला होता.
तसं इतिहासात डोकावंतांना एक मात्र नक्किचं प्रतिबिंबित होत होतं की इतरांना झुरवणारा आज स्वतः च झुरत होता आणि त्याचं विचारम्य मग्न अवस्थेत स्वतःला च प्रश्न करत बडबडत होता की "की काय खरंच तिने मला ब्लॉक केला का......?" आणि याचं आशावादी प्रश्नावर आपलेच अकलेचे तार-तम्य जुळवत संबधितांकड धाव घेत तिचे व्हाट्सएप चे अकाउंट सतत उघड-बंद करत तिचा प्रोफाइल फोटो दिसतो का तुम्हाला....? बघू तर द्या असं चित्त थरारक घोष वाक्ये ओघत सर्वत्र हाहाकार गाजवत धुंद होऊन गेला.आज केवळ नि केवळ त्याच्या च मूळ जी अनोळखी लोक तिच्या जवळ आली होती तीच आता त्याची खिल्ली उडवत माजा बघत,संस्काराचे धडे गाजवत होती.
सरते शेवटी हे सुद्धा म्हत्वाचेचं म्हणावें लागेल,कारण ब्लॉक करणं ही किती सोपं असत ना.......परंतु असं ब्लॉक करून स्वतः जरी मोकळं आपण होत असलो,तरी त्या ब्लॉक होणाऱ्या समोरील व्यक्ती ची मनाची बैचैन अवस्था चक्क आज त्यानें स्वतः अनुभवली असावी;करण याचं महाशयाने या पूर्वी अनेकांना ब्लॉक करत तरसवत मोठं-मोठे पराक्रम गाजविले होते चं. आता या प्रकरणांतून त्याने धडा तर घेतलाच आणि त्याचं बरोबरीने मनाशी पक्का निर्धार ही केला की;या नंतर अस ब्लॉक करून उगाचंच कुणाच्या भावनांचा खेळ मांडणार नाही.
आता जे झालं ते परब्रम्ह जरी प्रगटले तरी पूर्णतः वर येईल असें सुद्दृड सूर तर नव्हतेच,असो या सर्व प्रकरणात तिचं काय नि कसं? हे जरा बाजूला सारून आपण जर प्रियकरा कड डोकावलं तर लक्ष्यात येईल की ज्याला आपल्याला नुकसान अस म्हणता येईल ते फक्तं नि फक्तं त्या निर्दोष प्रियकराचंच.कारण प्रेमापोटी आंधळ्या प्रियकराने केलेला तो ३ ते ४ दिवस केलेला निश्फल अन्नत्याग त्यास चांगलाच भारी ठरला, कारण मानसिकतेने खचलेल्या प्रियकराला या अन्नत्यागा मुळ शारीरिक बेचैनता निर्माण झाली आणि यातन मग पुढं चीड-चीड करणं,कुणावरही उगाचंच रागावणं असें निरर्थक प्रकार घडू लागले आणि याचेच दुष्परिणाम म्हणून प्रियकराला सावरणारे चं त्यांच्या या तिरकस पद्धतीमुळे जरा लांबच झालें.
आता तिने जरी ब्लॉक करून हे प्रकरण मोडत नेण्याचा पर्यंत केला असला तरी हे काही सहज घडून येणार्या-पैकीं नव्हतं.........
खरं तर ब्लॉक केल्यानं फक्त पोकळी निर्माण हिते ती त्या सु-संवादाची,काही तिसऱ्या घरी उसर्या करणाऱ्या लोकांच्या कान-भरणी मूळ हे जरी सद्यस्थित निर्माण झालं असलं तरी त्या नात्यांची सुंदरता ही आज ही त्यांचा मनात तीच होती जी की आधी असावी, घाई-घाईने घेतलेले निर्णय हे कितपत यशस्वी ठरतात हे आपल्याला चांगल्या प्रकारे उमजते ते समजून घेण्या इतपत आपण वरिष्ठ आहातच.
खरं तर ब्लॉक केल्यानं फक्त पोकळी निर्माण हिते ती त्या सु-संवादाची,काही तिसऱ्या घरी उसर्या करणाऱ्या लोकांच्या कान-भरणी मूळ हे जरी सद्यस्थित निर्माण झालं असलं तरी त्या नात्यांची सुंदरता ही आज ही त्यांचा मनात तीच होती जी की आधी असावी, घाई-घाईने घेतलेले निर्णय हे कितपत यशस्वी ठरतात हे आपल्याला चांगल्या प्रकारे उमजते ते समजून घेण्या इतपत आपण वरिष्ठ आहातच.
घडलेला हा प्रकार फ़क्त त्या दोघांन पुरताच मर्यादित नसून बहुतांश प्रकरणात तुम्ही-आम्ही बघितला आहेच.......आता हेही साहजिक असेल की या प्रकणात आपण फक्त नि फक्त एकाच बाजू बघितली अजून ही ब्लॉक करून मोकळ्या झालेल्या प्रियसीची अवस्था ही आपणांस रहस्यमय चं असणार आहे......
सरते शेवटी मला एकंच सांगावंसं वाटेल की ब्लॉक केल्यानं फक्त अंतर हे बोलण्यातील वाढेल ना की त्या सुंदर नात्यातील..... आणि हा....!!!राहिला प्रश्न तो प्रोफाइल फोटो न दिसण्याचा तर त्याची आधीच प्रियकराने व्यवस्था सज्ज करून घ्यावी;अर्थातच २-४ जवळची असें जिवाभावाची मंडळी तैनात ठेवावी की जे वेळो-वेळी नि पदो-पदी प्रियसीच्या सर्व हालचालींच अजून नि थेट प्रेक्षपन करू शकतील.....
![]() |
Feeling Alone....... |
चला तर मग प्रियकराच्या मनाची बैचैन अवस्था रागावणारी ही काल्पनिक रहस्यमय कथा आज इथंच अल्पविराम घेऊ इच्छिते.....
धन्यवाद😃
धन्यवाद😃


No comments:
Post a Comment