कुठलंही अवलोकन करतांना रागा-संतापाच्या भरात एकमुखी प्रकरण निकाली काढलं ना की मग हे असं होतं....!क्षणिक द्वेषा पोटीं आपण नको नको ते बोलून बसतो,सर्वस्त्र भावनांची पायमल्ली करतो आणि स्वतःच त्या व्यक्तीस विसारण्या ऐवजी, त्याच्याच सुंदर स्मृतीत जगतो. नेमकं जे आपण जे वरती वाचलं ना अशीच साधर्ममय ठरेल अशी परिस्थिती त्या प्रियसिने प्रियकरास ब्लॉक करून निर्माण केली होती.
आणि हे बघ मी आता घरी जातेय,तर मूर्खा सारखे कॉल्स,मेसेजेस करून माझी पंचाईत करू नको.....😡 अश्या तिरकीत सशब्दांची प्रियसिने त्या प्रियकरास ताकीत दिली होती आणि याच परिस्थिती ला अनुसरून एके काळी आकाश गंगेतील सूर्य, चंद्र नि तारे ताडून आणू का ग प्रिये तुझ्यासाठी ,असे बडे बडे सूर गावसणारा बलाढ्य-निडर प्रियकर मात्र सुन्न चं होता.
मौतील जसे दारावर जाऊन शोकसभा भरवीत त्या दुःखद घटनेचं काय संतावन केल्या जाईल त्याही पलीकडं सभा भरवीत त्या प्रियकराचं मनाचं संतावन करण्यात जवळ जवळ ची सर्वच मंडळी रुजू झाली होती.
तरी प्रेमवेडा प्रियकर काही आवरेना.....................! याचं आपलं तेंच चाललं होतं भावा के कमी आहे माझ्यात....?असे वायफळ प्रश्न बोलत हा प्रियकर त्या प्रियसीच्या प्रेमात तब्बल ६० तास अर्थातच २ पूर्ण नि एक अर्धा दिवस मग्नधुंद होता.आता भल्या मोठ्या तोऱ्यात जरी प्रियसिने त्याला ब्लॉक करुन या साऱ्या प्रकारातून काढता पाय घेतला असला तरी तिला सुद्धा काही करमेना.....कारण
घरी जेवतांना तोंच....
इतरांशी बोलतांना तोंच....
झोपतांना तोंच....
ध्यानी मनी सुद्धा तोंच तो.....अशी बोचरी अवस्था त्या प्रियसीची होती. मी त्याला ब्लॉक करून,चुकीचं तर केलं नाही ना केलं? याचं प्रश्नाचं permutations and combination आपल्या डोक्यात घुमवत होती.सुट्यांचा आनंद उपभोगण्यासाठी घरी आपल्या प्रियसीचं धड घरात ही मॅन लागेना. तरी घरातील मंडळींना ही बाब लक्ष्यात आली असता;आपलं फुलपाखरू 🦋 का बरं बैचैन आहे,याची विचारणा करण्यासाठी सामोर आलेल्या आपल्या स्वतःच्या आईला सुद्धा;आपल्या दुधी दातांनी डंख मारत गप्पचं केलं.आपण उगाचंच घरीं थांबून आपल्या स्वकीयांवरच राग ओतन्या पेक्षा प्रियसिने महाविद्यालयात परतण्याचा मनि निर्धार केला असता घरच्यांनी भावनिक ओझे टाकत तिला बंदिस्त केलं.
शेवटी प्रियसीला जाणीव झालीचं, एक मी स्वतः त्याला ब्लॉक करून जरी या प्रकरणाचा "इतिश्री" करू इच्छित होती,तरी माझ्या स्वतःच्या नीच तर त्याला विसरणं अवघड झालंय, तर त्याचं का होत असणार?आज जवळ-जवळ २ दिवस उलटले असून ना त्याचा कॉल ना मेसेस...... कसा असणार तो ? याच सर्व बाबींची उजळणी करत,तिने नव्याने त्याचा भावनेचा सन्मान करत त्याला अन-ब्लॉक केलंच.
नेमकं आता अन-ब्लॉक जरी केलं असलं तरी,मीच स्वतः का बोलू ? याचं क्रमाने ९ तास तो ना ती कुणीचं कुणाशी बोललं नाही.या ९ तासांत प्रियकरास एक नाव संजीवनी जरी प्राप्त झाली असली तरी,एकदा आत्मसन्मानाची पायमल्ली झालेली असतांना पुन्हा नव्याने का तो बोचट प्रयन्त का करावा; म्हणून प्रियकर आपला शांतच होता.
![]() |
| तुझं माझं जमेना,नि तुझ्या-विना करमेना..... |
प्रियसी : तुझ्या कडे वेळ आहे का ? मला थोडं बोलायचं होतं.....
प्रियकर : ***(प्रियसीचं नाव घेत) नाही तर.....के केलं मी आता....😐
प्रियसी : का बरं तू काही वाईट केलं असा संशय आहे का तुला ?
प्रियकर : नाही नाही बोल ना......☺
प्रियसी :अरे....!मला ना कसं तरी च वाटत आहे,खरं तर तुझी काहीच चूक नाहीय हा.....हे सगळं काही क्षणिक होत हा तू उगाच मनाला लावून घेऊ नकोसं.........😊
प्रियकर : मला कळेल का ?
प्रियसी : काय तर ?
प्रियकर : मला ब्लॉक करून तुम्ही काय सिद्ध नि साध्य केलं ?
प्रियसी : माझी मर्जी,मी काही पण करेल....😂😂😂
प्रियकर : ठीक आहे....आल्या जीवनात मला ब्लॉक करणारी तू पहिली ठरलीस.....त्या बद्दल आपले मनस्वी अभिनंदन🙏
प्रियसी : मी पण आज वर ५६ लोकांना ब्लॉक केलंय.....परंतु अन-ब्लॉक होणारा तूच पाहिला हा.....
In continuations, let us assume.......
अश्या प्रेमळ शब्दांचा मारा करत प्रियसिने त्याला अन-ब्लॉक करत सर्व परिस्थिती पूर्णतास आणण्याच्या प्रयन्तनात ती मग्न होती. आता अनेक आश्वासनांचे पोकळ-पूल बांधत ती रात्र समोर जात होती.सरते शेवटी आता हे असले ब्लॉक करणं, पून्हा नव्याने होणार नाही ना ? याची मात्र प्रियकराने साक्ष घेतली होती.मध्यंतरी त्या६० तासात के नि कसें झालें, यांची लांबच लांब चर्चा झाली नि शेवट मात्र गोड च झाला.म्हणून चं अस अधोरेखित कारावास वाटतंय की....
🔥 "तुझं माझं जमेना नि तुझ्या-विना करमेना"🔥
झालेल्या चूक त्यांनी आपलंसं म्हणून पदरात घेत, एक नाविन्य-पूर्ण रचना करण्याचा मानस बाळगला. हे ऐकुन एका लेखकाच्या स्वरूपाने मला फार बरं वाटलं,कदाजीत तुम्हाला ही आवडेल हीच अपेक्षा....
🙏धन्यवाद🙏
कारण,
तुझं माझं जमेना, नि तुझ्या विना करमेना.....!
पुढील त्यांचा रंजक प्रवास लवकरचं आपल्या समोर प्रस्तुत असेल.


