Powered By Blogger

Tuesday, 17 April 2018

अपेक्ष्यांच्या मायनगरीत......

हो....!अपेक्षा ही माया नागरी तर ठरत नाही ना ?

              

           असे म्हणतात की जर तुमचे मागील जन्मातील संचित पुण्यरूपी असेल म्हणून कदाजीत तुम्हाला मानव रुपी जन्म या भू तळावर प्राप्त झाला असावा,याच अनुषंगाने आपण सर्वच जीवन सार्थक करण्यासाठी जीवापाड आपेक्षेचे मोठे ओझे घेऊन आयुष्य पार पाडत आहोत.
           जीवनात एक ध्येयं साध्य होताच,आपण दुसऱ्या ध्येयावर गतिमान होतो,खरंतर हे करणं काही अयोग्य नाहीच,परंतु हे सर्व करत असतांना आपण चालू असलेल्या वर्तमान काळा मध्ये न जगात सरळ भविष्य काळात निघून  जातो.याला कारणीभूत आहे ती आपल्यावर रुजलेली विचारधारणा ती अशी की मला होऊ घातलेल्या शालेय परीक्षेत जास्त गुण घेऊन यशवंत व्हायचं आहे,आता यात काही वावग नाही कारण यशवंत व्हावं अस कुणाला वाटणार नाही,परंतु त्या उद्याच्या यशाच्या चिंतेत आपण आजचं का चिंताग्रस्त होऊन हे सुंदर जीवन निरार्थी ठरवतं जावं?
यशाची अपेक्षा बाळगत आपण सध्या स्थितीत चं अनेक स्वप्न रंगवतो आणि हळुवार पणे त्या बहुरंगी स्वप्नाच्या मायनगरीत इतके मग्न होतो की स्वतःच्याच वास्तविकतेला भुरळ पडतो.
          यश आणि अपयश ही काही कुणाची मक्तेदारी नसून,ह्या दोन्ही स्पर्धेच्या बाजूच म्हणव्यात परंतु या अपेक्ष्यांच्या मायनगरीत यश संपादित करण्याच्या दिशेने योग्य ती संघर्ष करण्या ऐवजी त्या यशाची का बरं चिंता करत बसलेलो असतो?आणि याच चिंते मूळे आपन आपले वर्तमान आयुष्य फक्त त्या अपेक्ष्यांच्या ओझ्या मूळे  सुंदर आयुष्य नकळत उध्वस्त होत राहत.अश्या या अपेक्ष्यांच्या मायनगरीत अनेक महानायक उद्याच्या यशाची योग्य काळजी न करता फक्त करतात ती चिंताच, खरतर अश्या सर्वांना अत्यन्त आवश्यकता आहे ती सखोल आत्मचिंतनाची,कारण आपण आशावादी धोरना वरण केव्हा चिंतावादी धोरणाचा अवलंब करतो हे कळतच नाही.
           आयुष्य क्षणभंगुर आहे,पुढील एका सेकंदाला काय घडणार हे देखील कुणास ठाऊक नसतांना का आपण उद्याच्या अविश्वासू यशासाठी आजच्या सुंदर वर्तमान जीवनाचा केवळ त्या अपेक्ष्यांच्या माया नगरीत का बरं त्याग करतो?यशाची चाहूल ही नक्कीच असावी परंतु तिला एक स्वयंघोषित सीमा जरूर असावी अन्यथा अपेक्षाच्या ओझ्याखाली योग्य ते  प्रयत्न सोडून; आपण स्वप्नांच्या  माया नगरीत मग्नधुंद होऊन केव्हा भविष्या सोबतच कसा आपल्या सुंदर अश्या वर्तमान काळही चिंतेत घालवतो हे सुद्धा आपल्याला कळतं ही नाही.
       आयुष्य खूप सुंदर आहे,फक्त ते जगण्याची कला आत्मसात करता येन हे महत्त्वाचं. आल्या जन्मी स्वप्नं जरूर बघावं परंतु ते परिपूर्ण करण्यासाठी योग्य त्या दिशेने संघर्ष करावा आणि अपेक्ष्यांच्या मायानगरी पासन जरा लांबच वावरव. यश किंवा अपयश हे एकमेकांवर आधारित आहेत,आज तुमच्या पदरी अपयश जरी असलं तरी नक्कीच अनुभवाच्या जोरावर तुम्ही सर्वांना हुलकावणी देत यशाच्या सर्वोच्च शिखरांवर विराजमान कराल,परंतु तुम्ही जर का त्या अपेक्ष्यांच्या मायनगरीत अडकलेत तर तुमचा होईल तो फक्त भ्रमनिरास चं...........!
                         
                                             

13 comments:

Er. Ashwini Sawkare said...

अप्रतिम👌

Tarun@The Acumen said...

Best of luck brother.

Tarun@The Acumen said...

Best of luck brother.

Unknown said...

शब्द रूपातून जीवनातील वास्तविकता चितरणाचं सामर्थ आपल्या लिखणीतुन व्यक्त होत आहे...एक अप्रतिम प्रयत्न...-अनिकेत गावंडे.

Unknown said...

खूप छान सुरुवात केलीस भावा..अप्रतिम विचार आहेत👌🏻👌🏻

Unknown said...

Reality of life dear. Eagerly waiting for your next blog Sagar.

Sagar Ganesh said...

धन्यवाद...🙏

Sagar Ganesh said...

आपल्या प्रतिकियेचा मानापासन स्वीकार अनिकेत दादा...😎🙏

Sagar Ganesh said...

Thnx sirji.....🙏

Sagar Ganesh said...

Thank you pankaj sir...
Shortly I'll publish next blog.

Sagar Ganesh said...

Thnx bhaiii.....😎🙏

Rushikesh waghmare said...

वास्तविकतेची जाणीव करुण देणारी उत्कृष्ट लेखनी 👌👌👌 .®¶¶¶ .●√..

Rushikesh waghmare said...

वास्तविकतेची जाणीव करुण देणारी उत्कृष्ट लेखनी 👌👌👌 .®¶¶¶ .●√..